एल.बी.एच. एम. अतिजलद (ब्लिट्झ )आंतरराष्ट्रीय मानांकन खुली बुद्धिबळ स्पर्धा - २०२५

पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील एस.के.एन., सिंहगड स्कुल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट एल.बी.एच. एम. येथे अति जलदगती (ब्लिट्झ )आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेस अत्यंत उत्साहाने सुरुवात झाली.ही स्पर्धा २ १ मे रोजी दुपारी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर - निलाश साहा, कशिश जैन, आर्यन वार्ष्णेय तसेच फिडे मास्टर निखिल दीक्षित, सुयोग वाघ यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची शान वाढवली. सदर स्पर्धा आर्यन एंटरप्राईजेस तर्फे आयोजित करण्यात आली होती.